रत्नागिरी जिल्ह्यात 13 लाख 10 हजार 555 मतदार, अंतिम मतदार यादी जाहीर

0

विधानसभा निवडणूकीसाठी नामनिर्देन अर्ज भरेपर्यंत मतदार नोंदणी सुरु होती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 मतदार संघात 1755 मतदारांची संख्या वाढली असून आता 21 ऑक्टोबरला पाचही मतदार संघातील 13 लाख 10 हजार 555 मतदार आपला हक्कं बजावणार आहेत. त्यामध्ये 6 लाख 27 हजार 793 पुरुष आणि 6 लाख 82 हजार 752 महिला मतदारांचा समावे आहे. ही माहिती जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली.

HTML tutorial

जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात अंतिम मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे़ त्यामुळे दापोलीत 2 लाख 80 हजार 496 मतदार आहेत़ त्यामध्ये 1 लाख 33 हजार 505 पुरुष आणि 1 लाख 46 हजार 990 महिला मतदार आणि इतर 1 यांचा समावे आहे. गुहागर तालुक्यात 2 लाख 40 हजार 115 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 13 हजार 002 पुरुष आणि 1 लाख 27 हजार 113 महिला मतदार, चिपळूण तालुक्यात 2 लाख 70 हजार 175 मतदार असून त्यामध्ये पुरुष 1 लाख 32 हजार 124 आणि स्त्रिया 1 लाख 38 हजार 051, रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 81 हजार 924 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 37 हजार 652 पुरुष आणि 1 लाख 44 हजार 263 महिला, इतर 9 मतदार आहेत. राजापूर तालुक्यात 2 लाख 37 हजार 845 मतदार असून त्यामध्ये 1 लाख 11 हजार 510 पुरुष आणि 1 लाख 26 हजार 335 महिला मतदार आहेत. सेनादलातील 842 मतदार असून त्यामध्ये पुरुष 820 आणि 22 स्त्री मतदार आहेत.

8524 मतदान अधिकारी – कर्मचारी
निवडणूकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कंर्मचारी सज्ज झाले आहेत. 2131 कर्मचारी मतदान केंद्राध्यक्ष, 2131 अधिकारी सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष आणि 4262 इतर मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर निवडणूकं निरिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जिल्ह्यातील 1703 मतदान केंद्रांपैकी 101 मतदान केंद्रांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. संवेदनील मतदान केंद्र जिल्ह्यात एकही नाही़ मात्र दापोली तालुक्यातील एका मतदान केंद्रावर 75 टक्के मतदान झाले आणि त्यापैकी 90 टक्के मतदान एकाच उमेदवाराला होते. त्यामुळे या मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवले जाईल असे डॉ. मुंढे यांनी सांगितले. 142 मतदान केंद्रांवर निवडणूक निरिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

केंद्रीय पोलीस दलही बंदोबस्तासाठी
निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 918पोलीसांबरोबरच पोलीस दलाच्या पाच कंपन्या बंदोबस्तासाठी जिल्ह्यात आल्या आहेत. त्यामध्ये गोव्यातील दोन आणि आरपीएफच्या 3 कंपन्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here