विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १८ लाख ६१ हजार ६०० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीविषयीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, दारूबंदी अधिनियमाच्या अंतर्गत जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून २२५ धाडी घालण्यात आल्या आणि १५७ जणांना अटक करण्यात आली. ५७ हजार ५४० बल्क लिटर दारू जप्त करण्यात आली. तिची किंमत १८ लाख ६१ हजार ५५९ रुपये आहे.
