राफेल विमानाच्या चाकांच्या खाली लिंबू ठेवणे अवैज्ञानिक – अनिस

0

राफेल विमानाच्या चाकांच्या खाली लिंबू ठेवणे अवैज्ञानिक आहे. अशा गोष्टी आधुनिक ठिकाणी वापरणे लाजिरवाणे असल्याची टीका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस मिलिंद देशमुख यांनी केली. भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिवस आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर एका एअरबेस राफेल विमानाचा ताबा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला. पॅरिसमध्ये त्यांनी विमानात उड्डाण करण्यापूर्वी त्याची पूजा केली. त्यावेळी चाकांच्या खाली लिंबूही ठेवण्यात आले होते. त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. काहींनी पूजा आणि लिंबू ठेवण्याचे समर्थन केले असून काहींनी त्यावर टीका केली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here