नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा काल भारताचा 67 वा दिवस होता. लसीकरण सुरू झाल्यापासून काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत पाच कोटी लोकांना पहिली लस देण्यात आली. यात 79 लाखापेक्षा अधिक लोकं आरोग्य कर्मचारी आहेत. तर त्यातील 50 लाखापेक्षा अधिक लोकांना दुसरी लस देण्यात आली आहे. त्यासोबत 83 लाख 33 हजार फ्रंटलाईन कामगारांनी पहिली लस घेतली, तर 30 लाख 60 हजार फ्रंटलाईन कामगारांनी दुसरी लसदेखील घेतली आहे. आतापर्यंत साठ वर्षांवरील 2 करोड लोकांनी लस घेतली आहे. तर 45 वर्षांवरील दोन कोटी लोकांनी लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या 67 व्या दिवशी 15,80,568 लोकांना लस देण्यात आली. तर यातील लस देण्यात आलेले 2,05,871 लोकं आरोग्य कर्मचारी होते. देशभरात 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाला सुरूवात झाली होती. तर 2 जानेवारीपासून कामगारांना लस देण्यात आली होती. 1 जानेवारीपासून 60 वर्षांवरील लोकांना आणि 45 वर्षांवरील आरोग्याच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:37 PM 24-Mar-21