वर्षाचे बारा महिने नृत्यातून व्यायामाचे धडे गिरवणाऱ्या महिला दांडियाच्या रंगात रंगल्या. निमित्त होते फिटनेस मंत्रा आयोजित ‘नवरात्र 2019’ चे.
येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फिटनेस मंत्राच्या संचालिका अंकिता प्रभु पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या नवरात्र 2019 चे आयोजन केले होते. यावेळी मेधा कुळकर्णी, मीना गद्रे, माधुरी सुर्वे, संध्या भोसले, अंजली प्रसादे, मृण्मयी दळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ब्लॉसम कोचर च्या ऍरोमा मॅजिक चे प्रतिनिधी अक्षिता नाईक आणि ऋषिकेश सावंत यांनी त्यांच्या सौन्दर्य प्रसाधनांची भेट उपस्थित महिलांना दिली. तसेच आर्या ब्युटी केअरतर्फे उपस्थित महिलांच्या घरातील एका पुरुष व्यक्तीसाठी मोफत बॉडी मसाज चे कूपन देण्यात आले.
लहान मुलं, महिला, फिटनेसच्या विद्यार्थीनी तसेच प्रशिक्षक यांचे दांडिया राउंड ठेवण्यात आले होते. उपस्थित सर्वांनीच याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी उत्कृष्ट वेशभूषा – समरीन दसुरकर, उत्कृष्ट हावभाव – शुभ्रा महाडिक, उत्कृष्ट नृत्य – पूजा पवार, उत्कृष्ट केशभूषा- तृप्ती रहाटे, उत्कृष्ट एनर्जी दीप्ती खेडेकर अशी बक्षिसे देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपना सापते, रश्मी मांडवकर, पायल कोलते, ईशा साळवी, सोबिया पटेल यांनी परिश्रम घेतले.
