‘सिंधुदुर्ग जि.प. अध्यक्षपदासाठी राणेंकडून याचना, शपथा, आमिषं आणि धमक्या’ :आ. वैभव नाईक

0

सिंधुदुर्ग : फक्त सिंधुदुर्गच नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर तर भाजपकडून राणे समर्थक असलेल्या कणकवलीच्या संजना सावंत यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र दोन्ही पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या वेळेला ही निवडणूक चुरशीची झाली आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी अध्यक्ष निवडीवरुन भाजप खासदार नारायण राणे यांना लक्ष केलं.

राणे पिता-पुत्र या निवडणुकीत स्वतः लक्ष ठेवून आहेत. लोकसभेचं अधिवेशन सोडून राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून राहावं लागलं. यावरून राणेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं दिसून येत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षानी आपलाच विजय होईल असा दावा केला आहे. शिवसेनेला या निवडणुकीत जंगजंग पछाडावं लागलं आणि थेट मातोश्री कनेक्शन या निमित्ताने उघड झालं. राणेंच्या बालेकिल्ल्यात एखादा चिरा ढासळतो का हे पाहण्यासाठी मातोश्रींला थेट हस्तक्षेप करावा लागला, असा आरोप भाजपकडून केला गेला.

तर शिवसेनेनेही राणेंना शह देण्यासाठी रणनीती आखल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी अध्यक्ष निवडीवरुन राणेंना लक्ष केलं. राणेंना उमेदवार निवडीसाठी सुद्धा तडजोड करावी लागली, हीच शिवसेनेची ताकद आहे. स्वतः राणेंना अध्यक्षपदाच्या निवडीत सदस्यासमोर दयायाचना करावी लागली. काही ठिकाणी शपथ घ्याव्या लागल्यात तर काही जणांना आमिष दाखवली, तर काहींना धमकावलं, असा थेट आरोप वैभव नाईक यांनी राणेंवर केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:05 PM 24-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here