ब्रेकिंग: राणेंचा शिवसेना आणि महाविकास आघाडीला धोबीपछाड, सिंधुदुर्ग जि.प. अध्यक्ष निवडणुकीत भाजपाची बाजी

0

सिंधुदुर्ग : भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. आज झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार संजना सावंत यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करत बाजी मारली आहे. आज झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या संजना सावंत यांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांना ३० विरुद्ध १९ अशा ११ मतांच्या फरकाने पराभूत केले. जिल्हा परिषदेमध्ये आज सदस्यांकडून हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा भाजपाचा अध्यक्ष विराजमान झाल्याने जिल्ह्यातील राजकारणावर नारायण राणेंचे असलेले वर्चस्व निर्माण झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:04 PM 24-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here