पेट्रोल पंपाबाबतची वर्षभरात एकही तक्रार दाखल नाही

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्राहक आपल्या हक्कांबाबत उदासीन असल्याने इथल्या ग्राहक चळवळीला म्हणावी तशी गती मिळत नाही. इतर बाबींप्रमाणेच डिझेल आणि पेट्रोल वितरणाबाबतच्या हक्कांबाबतही अनभिज्ञ असल्याने पेट्रोल पंपाबाबत गेल्या वर्षभरात येथील वैध मापन केंद्राकडे एकही तक्रार दाखल नाही. या कार्यालयाकडे गेल्या वर्षभरात केवळ पाचच तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र या तक्रारी दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या दर आणि वजनाबाबतच्या आहेत. या पाचही तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. शहरातील काही पेट्रोल पंपांवर अजूनही पेट्रोल भरताना मापात पाप केले जात असूनही त्याबाबत वाहनचालक एक ग्राहक म्हणून अजूनही अनभिज्ञ असल्याचे लक्षात येते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:01 PM 24-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here