चिपळूण : रस्त्याने चालत जाणा-या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलने पलायन केल्याप्रकरणी बुधवारी एकास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. तुर्तास त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याद्वारे काही गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील शंकरवाडी येथील सौ. पूर्वा प्रसाद बैकर यांचे यांचे सुमारे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले होते. सौ. बैकर कामावरून पायी घरी जात असताना शंकरवाडी रोडवर ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजता ही घटना घडली होती. त्याप्रमाणे याविषयी जोरदार चौकशी सुरु असून चोरट्यांमध्ये स्थानिक तरुणांचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे.
