तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू

0

चिपळूण : तालुक्यातील कोंढे-माळवाडी येथे विद्युत तार तुटून घाटी जातीच्या बैलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजता घडली. या घटनेमुळे येथील शेतकरी श्रीधर सखाराम नलावडे यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
श्रीधर नलावडे यांनी आपला बैल चरण्यासाठी सोडला होता. मात्र, ते शेतात गेले असताना त्यांना बैल ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता त्यांना बैल जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेत गुरफटलेला दिसून आला. या बैलाची वैद्यकीय अधिकारी डॉ. नरळे यांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. त्यानंतर महावितरणचे अधिकारी श्री. कोकरे यांनी या घटनेचा पंचनामा केला. या घटनेची दखल घेत महावितरण विभागाने त्यांना दोन हजार रुपयांची तातडीची मदत देऊ केली. उर्वरित मदतीसाठी जिल्हा कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आह

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here