अपहार करून दोन वर्षापासून फरार असणाऱ्या डाकसेवकाला पोलिसांनी गुजरात येथून पकडले

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने पोस्ट ऑफिस मधील डाकसेवकाने अपहार करून गेली दोन वर्षे पोबारा केला होता. फरार असलेल्या या डाकसेवकाचा तपास सुरू असताना देवरूख पोलीसांनी सापळा रचून गुजरात सुरत येथून ताब्यात घेवून गुरूवारी अटक केली. यामुळे देवरूख पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार निकेश नरेश बने (रा. देवडे) असे आरोपी डाकसेवकाचे नाव आहे. तो ताम्हाने येथे पोस्ट कार्यालयात डाकसेवक म्हणून कार्यरत होता. या दरम्यान निकेश याने ठेवीची रक्कम (१० हजार २० रूपये) संबंधीत ग्राहकाला न देता ती स्वत:वर खर्च केल्याची तक्रार देवरूख उपवि•ााग पोस्ट ऑफिस देवरूखचे मंडळ अधिकारी विनोद मेदार यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली होती.

दिलेल्या फिर्यादीनुसार निकेश याच्यावर २१ मार्च २०१८ रोजी देवरूख पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४०९, ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पुर्वी निकेश हा ताम्हाने येथून बेपत्ता झाल्याची फीर्याद त्याची बहीण पुजा बने यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली होती. यानुसार देवरूख पोलीस निकेश याचा शोध घेत होते. निकेश हा गुजरात सुरत येथे असल्याची कुणकुण देवरूख पोलीसांना लागली होती. यानुसार देवरूख पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्स्टेबल जे. एस. तडवी व डी. एस. पवार हे गुजरात येथे रवाना झाले.
दोन दिवसांपुर्वी सापळा रचून गुजरात येथील अडाजंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून निकेश याला ताब्यात घेत अटक केली. याबाबत अधिक तपास श्री. तडवी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here