व्यापाऱ्याच्या पाठीशी उभे राहिले व्यापारी बांधव

0

🔳 लॉक डाऊन मध्ये उद्वस्थ झालेला व्यापारी मागील अनेक महिन्यांपासून अंधारात करीत होता व्यापार

रत्नागिरी : शहरातील व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा आपले दातृत्व सिद्ध केले आहे. स्वतःवर लॉक डाऊनचे संकट असताना देखील निसर्ग चक्रीवादळात बाधित कुटुंबियांना लाखो रुपयांची मदत रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी केली होती. याच जमवलेल्या रकमेतून आज रत्नागिरीतील एका व्यापाऱ्याचा अंधाराच्या साम्राज्यात अडकलेला व्यापार पुन्हा चालू होण्यास मदत केली आहे. शहरातील धनजीनाका येथे दिलावर शेमना यांचे फोटो फ्रेम तयार करण्याचे एक छोटेसे दुकान आहे. लॉकडाऊनच्या संकटात यांचा व्यापार उध्वस्थ झाला होता. वीज बिल थकल्याने मागील काही महिन्यापूर्वी महावितरणने वीजप्रवाह खंडित केला. पाणी बिल, मुलांची शाळेची फी सर्वच थकले. शेवटी मोठ्या आशेने शेमना यांनी रत्नागिरीतील तरुण व्यापाऱ्यांकडे धाव घेतली. या तरुण व्यापाऱ्यांनी चक्रीवादळात बाधित झालेल्या कुटुंबियांसाठी शहरातील व्यापाऱ्यांकडून मदत गोळा केली होती. त्यापैकी काही शिल्लक असणाऱ्या रकमेतून आज शेमना यांचे वीजबिल भरण्यात आले व महावितरण कडून त्यांचा वीज प्रवाह चालू करून देण्यात आला. यावेळी राजकुमार जैन, गणेश भिंगार्डे, निलेश शामकांत मलुष्टे, हेमंत वणजु, महावितरण चे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन, मकरंद खातू, सौरभ मलुष्टे, योगेश मलुष्टे, संदेश गांगण, मुकुल मलुष्टे, सचिन केसरकर, कौस्तुभ दीक्षित, अमेय वीरकर आदी युवा व्यापारी उपस्थित होते. रत्नागिरीतील प्रत्येक व्यापाऱ्याचे योगदान या मदतीत असल्याने या युवा व्यापाऱ्यांकडून सर्वांना धन्यवाद देण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:19 PM 25/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here