मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या यायिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, याबाबत कोणताही निर्णय न देता परमबीर सिंह यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याप्रमाणे आज परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या भ्रष्ट वर्तणुकीची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:59 PM 25-Mar-21