रत्नागिरी येथील ज्येष्ठ कलाशिक्षक आणि चित्रकार बापू गांधी (८० वर्षे) यांचे आज पहाटे साडेचार वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
श्रीधर ऊर्फ बापू गांधी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले जीडी आर्ट एएम होते. बापू गांधी यांनी मुंबईतल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे प्राध्यापक म्हणून काम केले, तर रत्नागिरी तालुक्यात टेंभ्ये हायस्कूल आणि बसणी हायस्कूलमध्ये कलाध्यापक म्हणून सेवा बजावली. उत्कृष्ट चित्रकार म्हणून १९९० साली त्यांना पुरस्कार मिळाला. इंद्रधनू पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रांचे तीन वेळा प्रदर्शन भरविले गेले.
दुबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शनातही त्यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. जर्मनीतील पत्रकारांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची मुलाखत घेतली होती. आयुष्यभर कलेची उपासना करणाऱ्या गांधी सरांचे शिक्षण कलाध्यापक आर्किटेक्ट तर काहीजण चित्रकार आहेत.
रत्नागिरी जिल्हा कला अध्यापक संघाचे ते माजी अध्यक्ष होते, तर पेठ किल्ल्यातील ज्योतिबा देवस्थानचे संस्थापक आणि माजी सचिव होते. सदानंद सरस्वती देवस्थानाचे विश्वस्त परमपूज्य गांधी महाराज यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते.
