तब्बल आठ वर्षांनंतर भारत-पाक क्रिकेट मालिका, आयसीसीच्या बैठकीकडे नजरा

0

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यावर्षी 3 सामन्यांची टी -20 मालिका खेळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. जर तसे झाले तर 8 वर्षांनंतर दोन्ही संघ द्विपक्षीय मालिकेत खेळतील. उभय संघांमधील शेवटची टी -20 आणि एकदिवसीय मालिका डिसेंबर 2012 मध्ये खेळवली गेली होती. 2012 मधली टी -20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका पाकिस्तानने 2-1 ने जिंकली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांना उभय संघांमधील मालिकेसाठी तयारी करण्यास सांगितले आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत यावर चर्चा होऊ शकते, तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 30 मार्चला भारतीय परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री यांची भेट होण्याची शक्यता आहे. यावेळी, दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिकेस सहमती दर्शविली जाऊ शकते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:03 PM 25-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here