सर्व पक्षांच्या सहमतीने रिफायनरी आणणार

0

रत्नागिरी – नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सूचक आणि लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प हा सर्व पक्षाच्या नेतृत्वाच्या सहमतीने आणला जाईल, असे ते म्हणाले. गुरुवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरीत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारबाबत पुनर्विचार करू, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे नाणार रिफायनरीचा मुद्दा कोकणात पुन्हा एकदा तापू लागला आहे. याबाबत भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत विचारले असता लोकांना विकास हवा असेल, नाणार प्रकल्प पुन्हा हवा असेल तर आम्ही तो आणण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

निवडणुकीनंतर लोकांच्या भावना समजून घेतल्या जातील, असे म्हणत भाजप नाणारबाबत किती आग्रही हे लाड यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, तर कणकवलीत नितेश राणे हेच भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. ही जागा भाजपसाठी महायुतीने सोडली आहे. त्यामुळे महायुती म्हणून ही जागा भाजपची आहे. भाजपचे उमेदवार आहेत त्याठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी जोमाने काम करतील, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या भूमिकेवर मात्र बोलण्याचे लाड यांनी टाळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here