संगमेश्वरची सुकन्या ठरली भारत-मालदीव प्रेसिडेंट चषक कॅरमलीगची विजेती

0

संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा उदय कदम या राष्ट्रीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये चांगली चमक दाखवत भारत-मालदीव प्रेसिडेंट चषक कॅरमलीगची ती विजेती ठरली आहे. आकांक्षाने भारताचा झेंडा मालदीव मध्ये फडकावत सुवर्णपदक मिळविले आहे.

HTML tutorial

अत्यंत कमी वयामध्ये आकांक्षाने अवकाशाला गवसणी घालत हे यश संपादन केले आहे. श्रीलंकेतील इंडो-मालदीव येथे ६ आॅक्टोबर ते १० आॅक्टोबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये श्रीलंका, मालदीव, भारत या देशाचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये भारताचे नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा करीत होती. यामध्ये तीने सिंगलमध्ये ९-८ असा सामना मारला आहे. यामुळे भारताने बेस्ट सिरीज पटकावले आहे. तर डबलच्या सामन्यात झालेल्या लढतीत ४-१ असा विजय प्राप्त केला आहे.

आंकाक्षा ही साखरपा नजीकच्या देवडे गावातील रहिवासी असून सद्या ती रत्नागिरी येथील शिर्के माध्यमिक विद्यालयात नववीमध्ये शिक्षण घेत आहे. आकांक्षा हीचा मामा संदीप देवरूखकर हे राष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू असल्याने त्यांचा प्रभाव तीच्या खेळावर पडला.

१४ वर्षाची असलेली आकांक्षा ही भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेली पहिलीच लहान खेळाडू ठरली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता भाग घेणारी आकांक्षा ही तिसरी कॅरमपटू ठरत आहे. आकांक्षाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेले यश हे स्पृहणीय आहे. आकांक्षा हिला तिचा मामा आंतरराष्ट्रीय कॅरमपट्टू संदीप देवरूखकर, महेश देवरूखकर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशचे अरूण केदार, श्री. मयेकर, श्रीम. गुळवणी, रत्नागिरी असोसिएशनचे श्री. भाटकर, मिलींद साप्ते, श्री. लिमये, मंदार दळवी, राहूल बर्वे, रवी कॅरमचे रवी घोसाळकर, श्री. सावंत याबरोबरच महाराष्ट्र कॅरम असोसिएशचे मार्गदर्शन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here