संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप शिवसेनेत प्रवेश केल्याने तुलनेने आघाडी दुबळी झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. निवडणूक आहे असं वाटतच नाही असं मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य याच परिस्थिती वरून आहे. यामुळेच आता अनेक उमेदवारांच्या जिंकण्याच्या चर्चा आता मताधिक्याच्या आकड्यांवर होऊ लागल्याचे पहावयास मिळत आहे. महराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य कोणाला मिळणार यावर अंदाज वर्तवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि अजित पवार या नावांच्या चर्चा उभ्या महाराष्ट्रात सर्वाधिक माताधीक्यासाठी होऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून, कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून, उदय सामंत रत्नागिरी मतदारसंघातून व राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पाचही उमेदवारांना जनतेमधून मिळणारा प्रतिसाद पहाता संपूर्ण महराष्ट्रात प्रचंड मताधिक्याने निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये या पाच नावांची चर्चा जोर धरू लागली आहे.
