सुप्रसिद्ध हिदम अॅरेंजर मारुतीराव कीर यांचा नातू रोहन सावंत याच्या जन्मदिनानिमित्त सावंत कुटुंबीयांनी तबला सोलो व जुगलबंदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम बुधवार १६ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे. उस्ताद अल्लाखाँ यांच्या शिष्या अनुराधा पाल, सुप्रसिद्ध हिदम अरेंजर नितीन शंकर आणि अनुपम घटक उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त तबला वादन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत रत्नागिरी, रायगड, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग येथील ६५ स्पर्धकांनी प्रवेश नोंदवला होता. यातील २९ जणांची निवड करण्यात आली असून, दि.१३ रोजी थिबापॅलेस येथील जयेश मंगल पार्क येथे ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. यासाठी वय वर्षे ८ ते १४ आणि १५ ते २० हे दोन गट आहेत. लहान गटासाठी ७ मिनिटे आणि मोठ्या गटासाठी १० मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण राकेश परिहस्त, हेरंब जोगळेकर करणार असून, विजय रानडे आणि पांडू बर्वे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन दिनकर सावंत यांनी केले आहे.
