रत्नागिरी : भंडारपुळे परिसरातील एका निर्जनस्थळी असलेल्या मंदिरापाशी पशुबळीचा प्रकार ग्रामस्थांच्या मदतीने उधळून लावण्यात यश आले आहे. याठिकाणी एका रेड्याचा बळी दिला जाणार होता. मात्र ग्रामस्थांनी वेळीच हा प्रकार उधळून लावला आहे. याप्रकरणी जयगड पोलिसांनी “देवरुख येथील तिघांना व जाकादेवी येथून एकाला असे
चार जणांना ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.पशुबळी चे प्रकार होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी तिघांना आणि जाकादेवी येथून एकाला असे चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
