पादचारी वृद्धाला धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : पादचारी वृद्धाला धडक देऊन त्यांना जखमी केल्याप्रकरणी सुशांत गोविंद रामगडे (वय, २८) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम गोतावडे (वय,७०) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार श्री.गोतावडे हे दि.९ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अंबाप्रसाद लक्झरीने लांजा ते मुंबई असे प्रवास करित होते. रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास गाडी जेवण करण्याकरिता ओमसाई हॉटेल येथे थांबली होती. यावेळी तुकाराम गोतावडे हे रस्ता ओलांडून पुढे जात असताना निवळी कडून हातखंबाकडे जाणाऱ्या दुचाकी (क्र.एम.एच.०८/ एएच-१४९७) ने धडक दिली. या अपघातात तुकाराम गोतावडे हे जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुकाराम गोतावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो.ना.पाटील करीत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here