पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी) कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय एस.टी महामंडळाने घेतला आहे.
एस.टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना विविध सणाला 31 ऑक्टोबर 2015 सालच्या परिपत्रक करारानुसार सानुग्रह दिला जातो. त्यानुसार कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी सानुग्रह देण्यात येणार आहे. 22 ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाने कर्मचाऱ्यांना केले आहे.
