दहा रूपयांत पोटभर जेवण, तर एक रूपयात आरोग्यसेवा ; शिवसेनेचा वचननामा

0

आरे मधील झाडांचे संरक्षण, दहा रूपयांत पोटभर जेवणाची थाळी, एक रूपयांत आरोग्य सेवा, शेतकर्‍यांच्या खात्यात थेट १० हजार रुपये आणि १५ लाख पदवीधारांना शिष्यवृत्ती यासह १० प्रमुख आश्‍वासनांचा समावेश असलेला वचननामा शिवसेनेने प्रसिद्ध केला. मुंबईत आज, शनिवारी मातोश्रीवर शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर या वचननाम्याचे प्रकाशन झाले. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करताना आदित्य ठाकरे, अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, मिलिंद नार्वेकर उपस्थिती होते.

HTML tutorial

वचननामा प्रसिद्ध होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी विविध प्रचारसभांमध्येच आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे आता वचननाम्यात मतदारांना खूश करण्यासाठी आणखी काय असणार याबाबत उत्सुकता लागली होती. यापूर्वीच काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. तर भाजपचा जाहीरनामा १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या जाहीरनाम्यांपेक्षा वेगळा आणि मतदारांना आकर्षित करणारा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. प्रत्येकाला १० रुपयांत सकस जेवणाची थाळी देणार, गावातील धार्मिक स्थळांना अनुदान देणार, राज्यातील सर्व गावांमधील पारंपारिक धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन दुरूस्ती व देखभालीसाठी अनुदान देणार आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार, राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी देणार, तालुका स्तरावर गाव ते शाळा, महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी २,५०० विशेष बसची सेवा सुरू करणार, शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकर्‍यांच्या खात्यात थेट रु. १०,००० प्रतीवर्षी जमा करणार, ३०० युनिटपर्यंत वीजवापर करणार्‍या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार, राज्यातील सर्व खेड्यांतील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण आखणार, १ रुपयात आरोग्य चाचणी सुविधा देण्यासाठी राज्यभरात १ रुपी क्लिनिक सुरु करणार म्हणजे एक रूपयात आरोग्य सुविधा, निराधार पेन्शन योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार अशी दहा प्रमुख वचने वचननाम्यात देण्यात आली आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here