शरद पवारांनी घेतली अमित शहांची भेट? महाविकासआघाडी सरकारची समीकरणे बदलणार?

0

मुंबई : सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांनंतर राज्यातील राजकीय घडामोडींवर वेग आला आहे. मोठ्या सुरु आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षाच्या नेत्यांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याबरोबर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. दरम्यान, जर शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली असेल तर राज्यात असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारवर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.राज्यात येत्या काळात नवीन समीकरणं तयार होणार का? महाविकास आघाडीची सत्ता जाणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:48 AM 29-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here