विधानसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी कायद्याचे पालन करावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यम कक्षाने चिपळूण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांच्यावर पहिल्या पेड न्यूजबाबत नोटीस बजावली आहे.
माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये पेड न्यूजचा मुद्दा निदर्शनात आणून देण्यात आला. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील एक उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचाराची एकतर्फी स्वरूपाची बातमी चिपळूणच्या स्थानिक वृत्तपत्रात आली असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
जाहिरातीच्या शासकीय दराने आठ हजार ६४० रुपयांचा खर्च उमेदवाराच्या खात्यावर लावण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.
याच बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भातील पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पूर्वपीठिकेत जिल्ह्यात १९६२ पासून झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकांच्या आकडेवारीसह माहिती देण्यात आली आहे. ही माहिती निवडणूक वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना उपयुक्त ठरणारी अशी असल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे सदस्य प्रमोद कोनकर, श्रीनिवास जरंडीकर, एनआयसीचे अविनाश जुगदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, समिती सदस्य सचिव तथा जिल्हा मा
