नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होत असतानाच आता शरद पवारांच्या एका गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान ही भेट अमित शाह आणि शरद पवार यांच्यात झाल्याचं बोललं जात आहे. अमित शाह आणि शरद पवार यांच्या गुजरात मधल्या गुप्त भेटीबद्दल उलट-सुलट चर्चा होत असतानाच याबाबत स्वतः अमित शाह यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. याबाबत अमित शाह यांना पत्रकार परिषदेत शरद पवारांसोबत गुप्त बैठक झाली का? असा प्रश्न विचारला असता शाह यांनी ‘सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत’ असं म्हणत सूचक वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी भेट झाल्याचं नाकारलं नाही.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:38 AM 29-Mar-21