३७० कलम रद्द केल्यामुळेच जम्मू-काश्मीरचा खरा विकास- डॉ. सहस्रबुद्धे

0

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील ३७० कलम रद्द केल्यामुळेच त्या प्रदेशाचा खरा विकास होणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी येथे केले.रत्नागिरी पदवीधर मंचातर्फे ३७० कलम आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात आज सायंकाळी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगीव्यासपीठावर अॅ ड. बाबासाहेब परुळेकर, सचिन वहाळकर आणि चंद्रशेखर पटवर्धन होते प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सहस्त्रबुद्धे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच जम्मू-काश्मीरमध्ये आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते, अशी स्थिती होती.

काही राजघराणी फायदा उठवत होती. तत्कालीन राज्यकर्त्यांनी चुका केल्या. निती आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षांत तेथील लोकांचे वार्षिक दरडोई उत्पन्न १५ हजार रुपये होते, तरीही गरिबीच राहिली. त्याच वेळी भारतातील अन्य राज्यांमध्ये फक्त साडेतीन हजार रुपये होते. निवडणुका नाहीत, जमीन खरेदी नसल्यामुळे रुग्णालये, बँका किंवा पर्यटन व्यवसाय नाहीत. काश्मिरी जनता गरिबच राहिली. परंतु केंद्रातील भाजप सरकारने कलम ३७० रद्द करून राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्याचे काम केले आहे. गेल्या दोन महिन्यांत येथे दहशतवादी हल्ले झाले नाहीत. गोळीबारसुद्धा झाला नाही. कडक बंदोबस्त आहे. जम्मू आणि काश्मीरच्या विकासाची दारे उघडली गेली. विकासापासून फार दूर असलेल्या तेथील जनतेच्या भावविश्वािची फाळणी झाली असती, तर ती भरून काढणे शक्य झाले नसते. त्यामुळेच मोदी सरकारने ते कलम रद्द केले. हे कलम रद्द करण्याच्या वेळी मला संसदेत मतदार म्हणून सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो.

डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले की, भारतात विविध प्रांतांत एकात्मता नांदते. रामचंद्रन, रामय्या, रामभाऊ, रामभाई अशा अनेक नावात राम आहेच. विविधतेतील एकता जपली पाहिजे. १९४७ साली काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी सामीलकीनामा जाहीर केला. त्यानुसार पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनसुद्धा भारतात आला असता. परंतु त्यावेळी पाकिस्तानातील टोळीवाल्यांनी हल्ले केले. त्या वेळी भारतीय फौज गिलगिटपर्यंत पोहोचली. काही क्षणात तो भाग आपल्याला मिळाला असता. मात्र शांतीदूतांनी फौजेला मागे बोलावले. दोन देशांचा प्रश्नष संयुक्त राष्ट्रसंघात नेला. मुस्लिमबहुल नावाखाली मतांचे राजकारण केले आणि कलम ३७० कलम त्यात घातले. हे एक घृणास्पद कारस्थान होते आणि त्यामुळेच एकात्मतेला छेद दिला, असेही डॉ. सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here