भाजप घराणेशाहीवर चालणारा पक्ष नसल्याने यशस्वी – विनय सहस्रबुद्धे

0

भारतीय जनता पक्ष घराणेशाहीवर चालणारा पक्ष नसल्याने काश्मीरसारख्या प्रश्नावर योग्य रणनीती आखणे पक्षाला शक्य झाले. त्यामुळेच या पक्षाला राष्ट्रीय पातळीवर यश मिळाले असून महाराष्ट्रातसुद्धा पुन्हा एकदा याच पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता येईल, असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरीत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आज बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशात १७०० राजकीय असून त्यातील ५० पक्षांकडे सत्ता आहे. त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. लाटेच्या भरवशावर आणि एखाद्या नेतृत्वावर विसंबून राहणारे ते पक्ष आहेत.

पाच-सहा पक्षच घराणेशाहीवर अवलंबून नाहीत. त्यात भाजप अग्रस्थानी आहे. घराणेशाहीची पालखी घेऊन पक्ष सत्तेच्या राजकारणात उतरलेला नाही. विचारासाठी उतरलेला आहे. म्हणूनच काश्मीरसारखे प्रश्न सोडविणे पक्षाला शक्य झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचपैकी एकही जागा भाजपला मिळालेली नाही. त्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, कोकणातील कार्यकर्ते त्यागसम्राट आहेत. कार्यकर्त्यांनी हताश होण्याचे कारण नाही. त्यांनी भाजपचा झेंडा अधिक जोमाने फडकवण्यासाठी कामाला लागावे. वेगवेगळ्या स्थितीत वेगवेगळे निर्णय होतात. संधी मिळाली नाही तरी उमेद टिकून राहिली पाहिजे. कोकणातील कार्यकर्त्यांच्या त्यागाची योग्य जाणीव भाजपच्या केंद्रीय आणि प्रदेश नेतृत्वाला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना मी लिहून घेतल्या आहेत. त्या तितक्याच तीव्रतेने मांडेन. राजकारण म्हणजे भजनी मंडळ नव्हे. आकांक्षांची परिपूर्ती झाली पाहिजे. युती झाली म्हणून आपल्याला संधी नाही, असे नाही. कार्यकर्त्यांची उमेद टिकून आहे. पुढील निवडणुकांमध्ये भाजपची ताकद दाखवण्याकरिता पूर्वीच्या चुका, उणिवा सुधारू. बूथप्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख अशी रचना महत्त्वाची असून पक्षाला बळ मिळेल. कार्यकर्त्यांचे प्रश्न. सोडवून त्यांना बळ देण्याकरिता दर दोन महिन्यांनी खासदार दौरा करतील. कोकणातील प्रश्नि संसद किंवा मंत्रालयात अडले असल्यास ते सोडवले जातील. कार्यकर्त्यांच्या व्यथा वरिष्ठ पातळीवर तितक्याच तीव्रतेने मांडल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार असेल. दररोज १८-१८ तास सचोटीने काम करणारे हे सरकार आहे. कार्यकर्त्यांना हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गेल्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर १२२ जागा विजय मिळाला. यापुढेही कार्यकर्त्यांनी अधिक मेहनत घ्यावी.

जिल्हाध्यक्ष अॅ ड. दीपक पटवर्धन यांनी सहस्रबुद्धे यांचा सत्कार केला. चार विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेले अर्ज मागे घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी सहस्रबुद्धे आवर्जून आले. ही गोष्ट सुखावणारी असून यामुळे कार्यकर्ता अधिक जोमाने कामाला लागेल, असे पटवर्धन म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here