‘जनता कर्फ्यू’ संपूर्ण देशासाठी आदर्श उदाहरण ठरला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : देशावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. पहिल्या लाटेवर मात केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. महाष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असून, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांशी ‘मन की बात’ केली. यावेळी मोदी यांनी लॉकडाउनच्या वर्षपूर्तीनिमित्त काही आठवणींनाही उजाळा दिला. मोदी म्हणाले, ‘गेल्या वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण देशासाठी आदर्श उदाहरण ठरला. शिस्तीचं हे अभूतपूर्व असं उदाहरण होतं. येणाऱ्या पिढ्यांना गोष्टींचा गर्व वाटेल,’ असं मोदी म्हणाले आहेत. पुढे बोलताना मोदी म्हणाले, ‘त्याचप्रमाणे कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे, हे सगळं कोरोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच कोरोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिले. मागील वर्षी आपल्यासमोर प्रश्न होता की, कोरोना लस कधी येणार? आता आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकर मोहीम राबत आहे,’ असं मोदी यांनी यावेळी सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:55 PM 29-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here