माखजनमध्ये तरुणीची आत्महत्या

0

आरवली : माखजन येथे सोमवारी दुपारी श्रद्धा राजेंद्र जाधव (१९), रा. माखजन बौद्धवाडी या तरुणीने अभ्यास करत असताना अचानक गळफास लावून आत्महत्या केली. श्रद्धा सकाळी ११ वा. सुमारास अभ्यास करण्यासाठी सिद्धार्थ जाधव यांच्या घरात गेली होती. या घरात कोणी नसते. दुपारी उशीर झाला तरी श्रद्धा जेवायला आली नाही म्हणन तिची आई सिद्धार्थ जाधव यांच्या घराकडे गेली. त्यावेळी घराचा दरवाजा बंद असल्यामुळे आईने खिडकीतून पाहिले असता श्रद्धा हिने ओढणीने पंख्याला गळफास लावलेला दिसली. श्रद्धा हिने अभ्यास करताना अचानक आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. याबाबत तपास पोलिस निरीक्षक उदय झावरे करीत आहेत

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:43 PM 30-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here