”काँग्रेसमध्ये बेबंदशाही, शिवसेनेत तारतम्य नाही”

0

रत्नागिरी : सध्या काँग्रेसमध्ये बेबंदशाही सुरू आहे, तर शिवसेनेत तारतम्य राहिलेले नाही. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. पक्ष जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसला नाइलाजाने आंदोलने करावी लागत आहेत, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते मधुकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.

चिपळूणच्या भाजप कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, स्वामीनाथन आयोगाने २००६ मध्ये शेतीकायदा अहवाल दिला होता. २०१४ मध्ये त्याच्या अंमलबजावणीला सुरवात झाली. आठ वर्षांच्या कालावधीत शेतकयांचे जाणते राजे काय करीत होते? संसदेत शेती कायद्यावर तब्बल १२ वेळा चर्चा झाली. त्यावर विरोधकांनी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केलीच नाही. केवळ कायदा मागे घ्या, हीच त्यांची मागणी होती. सुधारित शेती कायद्याने शेतक-यांना जगाच्या बाजारपेठेत आपला शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य आहे. यातील सर्वच बाबी शेतकर्यांतच्या हिताच्या असल्याने मोदी सरकारने त्याची अंमलबजावणी केली. काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केवळ दलालच निर्माण करण्याचे काम केले. शेती व्यवस्थापनातील दलाली बंद झाल्याने काँग्रेसचे नेते विरोधाचे राजकारण करीत आहेत, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
सद्यःस्थितीत काँग्रेसमध्ये प्रचंड मरगळ आलेली आहे. पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेल्या शिवसेनेमुळे काँग्रेस जिवंत आहे. पेट्रोलने शंभरी गाठल्याने महागाईत वाढ झाली. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणे केंद्राच्या हातात नाही. केंद्र सरकारची वित्तीय तूट १० लाखावर पोहोचली आहे. केंद्राने आकारलेल्या ३३ टक्के करातील ४२ टक्के रक्कम राज्याला परत केली जाते. त्यामुळे केंद्रावर आगपाखड करणार्याआ ठाकरे सरकारने इंधनावरील कर कमी करायला हवेत, असे सांगून चव्हाण म्हणाले, काँग्रेस सरकारने लोकरंजनाचेच कायदे केले. मात्र, भाजप सरकारने उद्योजक आणि कामगार या दोघांचाही समतोल साधला आहे. काँग्रेसने सब्सिडी देऊन केवळ लोकांना परावलंबी करण्याचे काम केले. ज्याला आवश्यक आहे, त्यालाच मदत करण्याची भूमिका सध्याच्या केंद्र सरकारने घेतली. यातूनच शेतकयांना प्रत्येकी ६ हजाराचे अनुदान देण्यात आले. काँग्रेस आणि शिवसेनेच्या भानगडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारचराज्य कारभार चालवत आहेत. शेतकरी आणि कामगार कायदाविरोधी आंदोलने करून केवळ पक्ष जिवंत ठेवण्याचा खटाटोप काँग्रेसकडून सुरू आहे. याकामी विनाकारण कार्यकर्त्यांना वापरले जात आहे. केंद्र सरकार विरोधात चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे, असे चव्हाण म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:51 PM 30-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here