रत्नागिरी : पैश्यांचे गैरव्यवहार आणि त्यातून होणार ताण तणाव यातून कृषी संशोधन केंद्र शिरगाव येथे कार्यरत कर्मचारी महेश पडावे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा संशोधन कंद परिसरात सुरु होती. महिलेवर हल्ला करून घरी येऊन महेश पडावे याने सोमवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी शहरानजीकच्या शिरगाव कृषी संशोधन केंद्रात लिपिक म्हणून काम करणाऱ्या महेश पडावे (४७, रा. परटवणे, रत्नागिरी ) याने सोमवारी सकाळी संशोधन केंद्रातील महिला कर्मचारी छाया चव्हाण हिच्यावर हल्ला केला आणि तिथून तो निघून गेला. त्यानंतर घरी येऊन महेश पडावे याने गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली.
महेश पाडावे पूर्वी सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र (मत्सालय) येथे कार्यरत होता. महिला कर्मचाऱ्यावरील हल्ला आणि आत्महत्येमागचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यामागे काही आर्थिक व्यवहार आणि त्यातून निर्माण झालेले ताण तणाव यातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. महेश पडावे गेली काही दिवस रत्नागिरीतून गायब होती असे देखील समजत आहे.
