”शरद पवारांच्या पोटात आत्ताच का दुखतंय, पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रात सत्तांतर होणार”

0

नवी दिल्ली : शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर एकीकडे भाजपचे प्रमुख नेते फोन करुन त्यांची विचारपूस करत असताना दिल्ली भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी मात्र पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी शरद पवार यांच्या तब्येत बिघडण्याचा थेट संबंध सचिन वाझे प्रकरणाशी जोडला आहे. नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटते की, ‘दाल मे कुछ काला नही, पुरी दालही काली है’, असे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असे वाटत असल्याची खोचक टिप्पणीही नवीन जिंदल यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:42 PM 30-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here