उखडलेले रस्ते, बंद पडत असलेल्या मराठी शाळा, बसस्थानकाचे ठप्प पडलेले काम, पाणी योजना मुदत वाढीत घुसमटलेली; रत्नागिरी शहराच्या विकासाचा हा कोणता टप्पा : ॲड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातले रस्ते उखडून ३ महिने झाले. धुळीच साम्राज्य, चालता न येणारे रस्ते, रस्त्यात स्वैर फिरणारी गुरे ही रत्नागिरी नगराची ओळख झाली आहे. ४ वर्षे होऊनही पाणी योजना मुदतवाढीच्या गर्तेत अडकलेली आहे आणि नागरिक पाणी पाणी टाहो फोडत आहेत. मुदतवाढ, त्यातून कॉस्टवाढ या दुष्टचक्रात रत्नागिरीची पाणी योजना नेमकी कधी पाणी पुरवेल हे सत्ताधिशच सांगोत. रत्नागिरी एस.टी. बसस्थानक हे आणखी एक विकासाचे उदाहरण रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एखादा जून खंडहर असाव तशी अर्धवट अवस्था करून रत्नागिरीला विद्रूप स्वरूपात पुढे आणण्याचा खटाटोप सुरू असावा, असं वाटावं असं हे चित्र. गेले कित्येक महिने हे काम पुढे सरकत नाही बसस्थानकाच्या या कामामुळे होणारी वाहतुकीची कोंडी पॅसेंजरची गैरसोय उन्हा-पावसात पॅसेंजरची होणारी होरपळ या सगळ्यांकडे संवेदनहीनपणे पाहू शकण्याची दैवी ताकद जणू सत्ताधीशांना प्राप्त झाली आहे. रत्नागिरीची इतकी दयनीय अवस्था यापूर्वी झाली नसेल. रत्नागिरीतील मराठी शाळा या एक-एक करून इतिहास जमा होताना दिसत आहेत. लोकमान्य टिळकांची शाळा, तिची दोन मजली इमारत जमीनदोस्त झाली. तिथे परत शाळा होणार की लोकमान्य टिळकांची शाळा म्हणून प्रसिद्ध ही शाळा आता केवळ इतिहासात जमा होणार. आगाशे कन्या शाळा बंद झाली. अशा काही शाळा बंद होत आहेत. या शाळाबद्दल नेमकी भूमिका काय, नेमक भविष्यातलं नियोजन काय याबाबत इतकी उदासीनता का? सातत्याने जनतेने विश्वास ठेवत विजयाचं माप भरभरून दिलेल्या सत्ताधीशांचे रत्नागिरीतल्या प्रश्नांबाबत नेमके काय सुरू आहे. उखडलेले रस्ते, प्रलंबित पाणी योजना, बंद पडत चाललेल्या शाळा, ठप्प पडलेले एस.टी. बसस्थानकाचे काम हा विकासाचा कोणता टप्पा आहे? हेच समजत नाही. अशी बोचरी प्रतिक्रिया भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. न झालेल्या या कामासंदर्भात आंदोलन करता येईल. मात्र सध्या कोरोना संकटामध्ये आंदोलन हा मार्ग योग्य नाही. मात्र जनतेच्या प्रश्नासंदर्भात जनतेमध्ये जाऊन जनजागरण करण्याच काम भा.ज.पा. करेल. असे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:04 PM 30-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here