रत्नागिरीत मोबाईल आणि खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी

0

रत्नागिरी : लत्या दुचाकीवरच खिशातला मोबाईल काढता काढता समोर आलेला खड्डा चुकवता न आल्याने अपघात होऊन दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. तर चालक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीवरून रिझवाना समीर मुजावर (45, रा. शिरगाव) या शिरगाव ते रत्नागिरी असा दुचाकीवरून प्रवास करत होत्या. दुचाकी चालकाला मोबाईल आल्याने त्याने गाडी सुरू असतानाच तो खिशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत मार्गात समोर आलेला खड्डा त्याला समजला नाही. चालकाचा तोल गेला आणि भीषण अपघात झाला. यात रिझवाना समीर मुजावर यांना गंभीर मार लागत त्या जागीच ठार झाल्या. तर चालकालाही गंभीर दुखापती झाल्या आहेत. शिरगाव येथील दर्गा वळणावर हा अपघात झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here