अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

0

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातील दारिद्र्य दूर व्हावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिजित बॅनर्जी, इस्थर डफलो, मायकल क्रेमर अशी या तिघांची नावे आहेत.

या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

अमर्त्य सेन यांच्यानंतर प्रदीर्घ काळाने भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल देऊन गौरवण्यात आले आहे. रविंद्रनाथ टागोर, सी. व्ही. रामन, संत टेरेसा, अमर्त्य सेन आणि कैलाश सत्यर्थी या पाच जणानंतर नोबेल पुरस्कार जिंकणारे अभिजित बॅनर्जी हे सहावे भारतीय आहेत. तर अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातले नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी हे दुसरे भारतीय ठरले आहेत. रविंद्रनाथ टागोर यांना साहित्यातील योगदानासाठी, सी. व्ही. रामन यांना भौतिकशास्त्रातील योगदानासाठी, संत टेरेसा यांना शांततेचा, अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठी, कैलाश सत्यर्थी यांना शांततेचा तर आता अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठीचा नोबेल देऊन गौरवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here