पुणे : पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते हि हतबलता. असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली. प्रबळ विरोधी पक्ष नाही, त्यामुळे मनाला वाटेल ते निर्णय घेतात. त्याने राज्याची, देशाची अधोगती होते. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
सव्वाशे वर्ष मराठेशाहीने ह्या संपूर्ण भूप्रदेशावर राज्य केलं होतं पण आपला इतिहास पोहचवला जात नाही. त्या वैभवशाली इतिहासाचा प्रचार-प्रसार सरकारने करायचा असतो. पण हे सरकार पुतळ्यांची स्मारकं करण्याच्या घोषणेत मश्गुल आहे.
