‘आई माझी काळूबाई’ मधून वीणाची एक्झिट, ‘या’ अभिनेत्रीची ‘आर्या’ म्हणून एंट्री

0

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई माझी काळूबाई’ ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतील मुख्य नायिका तब्बल तिसऱ्यांदा बदलली जात आहे. प्राजक्ता गायकवाड, वीणा जगतापनंतर आता ‘आर्या’ ही भूमिका अभिनेत्री रश्मी अनपट सकारणार आहे. रश्मीने तिचा या मालिकेतील लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. आधीच अनेक वादांमुळे चर्चेत असलेली ही मालिका आता वीणाच्या एक्झिटमुळे चर्चेत आली आहे. वीणाने या मालिकेला राम-राम म्हटल्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत अभिनेत्री रश्मी अनपटने तिचा ‘आर्या’ लूक सोशल मीडियावर शेअर केल्याने आता तीच ही भूमिका साकारत असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. रश्मीने या मालिकेचे शूटिंग सुरु केले असून, तिच्यावर चित्रित झालेले भाग आजपासून (31 मार्च) प्रदर्शित होणार आहेत. रश्मी या पोस्टमध्ये लिहीते की, ‘आर्याच्या भूमिकेत,तुमचा आशिर्वाद आणि प्रेम असुदे’. आता आर्याच्या रुपात रश्मीला प्रेक्षक किती पसंत करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

…म्हणून वीणाने सोडली मालिका
‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या शुटिंग शेड्युलमुळे वीणा सतत आजारी पडत होती. त्यामुळे वीणाने ही मालिका सोडली असल्याचे समोर आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:23 AM 31-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here