शिवसेना मंत्र्यांनी कोंकणात उद्योग क्षेत्रात काय दिवे लावले ते जरा प्रचारदरम्यान जनतेला सांगा : संतोष गांगण

0

रत्नागिरी : मागील पांच वर्षे केंद्रात व राज्यात कोंकणातील शिवसेना नेत्यांकडे उद्योग मंत्रालय असताना किती उद्योग आणून नवीन रोजगार निर्मिती केली. जनतेची दिशाभूल करणाऱ्या  या नेत्यांनी किती रिफायनरीचा शास्त्रीय पध्दतीने अभ्यास केला ते जरा जनतेला कळू द्या. नाणार रीफायनरी असो किंवा वादट एमआयडिसीसाठी नोटिफीकेशन याच मंत्रीमहोदयानी काढायची आणि नंतर मतांच्या राजकारणासाठी जनतेच्या भावनांशी खेळायच, यातुन कोंकणी तरुणांचे भवितव्य अंधारमय केले आहे. सन्माननीय मुख्यमंत्री श्रो .देवेंद्र फडणवीस  तसेंच भाजप उपाध्यक्ष मा. श्री. प्रसाद लाड यांनी रिफायनरीविषयी सकारात्मक भूमिका मांडून शेतकऱ्यांना विश्वासात घेउन चर्चा करू असे सांगितले आहे. त्यांनी कोणताही निर्णय लादलेला नसतात त्याच मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधे राहुन एवढी टोकाची भूमिका घेणे अशोभनीय आहे. जर रिफायनरीच्या विरोधात जनता तुमच्या सोबत आहे तर एवढं बेताल वक्तव्य करण्याची आवश्यकता काय ? म्हणजे कोंकणातील जनता ग्रीन रीफायनरीच्या समर्थनार्थ आहे आणि त्यांचा व बेरोजगारांच रोष  ओढाऊन शिवसेना निवडणुकीत स्वतःच नुकसान करून घेणार एवढ मात्र निश्चित आहे. असे मत समृद्ध कोकणचे संतोष गांगण यांनी व्यक्त केले आहे.

रीफायनरी समर्थन  विषयावर भाजपची   भूमिका स्पष्ट असताना आमच्या पक्षाचे समर्थन  विधानसभा निवडणुकीत यांना कसे चालते ? भाजप शिवसेना महायुतीचा धर्म पाळून आणि वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून मी जरी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असेल, परंतु आदरणीय मुख्यमंत्री व आमच्या पक्षाच्या वरिष्ठांवरील कोणाकडूनही टीका मी व  कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत. कोणाची माय कधी काय करेल व कोणाला कोण गाडेल हे येणारा काळ ठरवेल असा टोला देखील भाजप नेते संतोष गांगण यांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here