वाद सोडवण्यासठी गेलेल्या पोलिसपाटील यांनाच मारहाण

0

दापोली : वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसपाटील यांनाच मारहाण करण्यात आली असल्याची घटना दापोली तालुक्यातील वाघिवणे गावात घडली. याबाबत संशयित महादेव शिगवण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार वाघिवणे गावातील पांडुरंग भागोजी साळवी यांना संशयित महादेव बाबू शिगवण दि. २८ मार्च रोजी रात्री ९.१५ वा.च्या सुमारास शिवीगाळ करत होता. यावेळी पांडुरंग साळवी यांची पत्नी अलका या मध्ये येऊन शिवीगाळ का करतोस असे विचारले असता संशयिताने अलका यांना शिवीगाळ करीत हाताच्या थापटाने मारहाण केली. म्हणून साळवी यांनी पोलिस पाटील संजय हरी मालक यांना संशयित शिगवण याला गावात उगाचच अशांतता व वाद नको असे समजावून सांगण्यासाठी बोलावून आणले होते. मात्र, संशयित याने गावचे पोलिसपाटील यांना सुद्धा शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. दरम्यान, पोलिसपाटील संजय मालक यांनी महादेव शिगवण याच्याविरोधात तक्रार दाखल केली. तपास दापोली पोलिस उपनिरीक्षक पूजा हिरेमठ व हेड कॉन्स्टेबल चौरे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:58 PM 31-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here