शिवसेनेच्या प्रवक्तेपदी आमदार भास्कर जाधव

0

चिपळूण : शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी निवड झाली आहे. पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही निवड जाहीर केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेची भूमिका आ. भास्कर जाधव ठामपणे मांडणार आहेत. आ. भास्कर जाधव हे मुळातच शिवसेनेच्या मुशीतील आहेत. त्यांनी जि.प.सदस्यापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर चिपळूणचे सेनेमधून दोनवेळा आमदार, राष्ट्रवादीतून विधान परिषद आमदार, गुहागरमधून दोनवेळा राष्ट्रवादीकडून विधानसभेचे आमदार आणि शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून तिसऱ्यावेळी गुहागरमधून आमदार झाले. तसेच राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यमंत्री, कामगार मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांना आदर्श संसदपटू हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. विधानसभेत तसेच प्रचारसभांत आक्रमकपणे विचार मांडणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना होती. मात्र, विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपच्या टीकेला कडाडून दिलेले उत्तर यामळे त्यांनी पन्हा एकदा शिवसेना नेत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. रामपूर येथे घेतलेला बेरोजगार मेळावा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांना जि. प. अध्यक्षपद दिले. त्यानंतर आ. भास्कर जाधव यांची सेनेच्या प्रवक्तेपदी निवड केली. या निवडीबद्दल आ. जाधव यांचे अभिनंदन होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:39 AM 01-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here