रत्नागिरी : महेश पाडावेच्या सुसाईट नोट मध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाडावे याने पत्नीच्या नावे आधीच सुसाईट नोट तयार केली होती. त्यावर पत्नीची सहीहि त्याने घेतली होती. आधी प्रेयसीची नंतर पत्नीची हत्या करून त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा कट त्याने आखला होता. प्रेम प्रकरणातून महेशने टोकाचा निर्णय घेतला होता.
सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास परटवणे येथील सागर निनाद इमारतीत प्रियकर महेश पाडावे याने प्रेयसी छाया चव्हाण यांच्या गळयावर चाकूने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या हल्ल्यातून बजावल्यानंतर महेशचे अनेक कारनामे पुढे येत आहेत.
पाडावे हा शासकीय कामकाजात पारंगत होता. २० वर्षात त्याने एकदाहि रजा न घेतलेली नाही. साप्ताहिक सुट्टी दिवशीहि कार्यालयात जावून प्रलंबित काम करत असे. परंतु त्याचे आर्थिक व्यवहार कुटुंबियांना अडचणीचे ठरत होते. चांगल्या पगाराची नोकरी असतानाहि तो घरी पैसे न देत असल्याने आईची पेंशन, पत्नी घरकाम करुन मिळत असलेल्या पैशातूनच कुटुंब चालत होते.
सुमारे १० दिवसापुर्वी महेश बेपत्ता झाला होता. तो पुन्हा रत्नागिरीत आला. दहा दिवस आपण पनवेल येथे असल्याचे पोलीसांना सांगितले. कार्यालयातील सहकार्यांसह मित्रांकडून त्याने उसने पैसे घेतले होते. नव्या प्लटचे कर्ज त्याच्या डोक्यावर होतेच तर शिरगांव बाणेवाडी येथील विकलेल्या जुन्या जागेचे पेपर खरेदीदाराला न दिल्याने त्यांचाहि तगादा सुरुु होता. महेशने त्यांच्याकडून पाच लाख घेतले होते. कर्ज बाजारीपणामुळे महेश नैराश्यात होता.
छाया चव्हाण यांच्या सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून वाद सुरु होते. त्यातूनच त्याने पत्नी, प्रेयसीला संपवून स्वतः आत्महत्या करण्याची तयारी केली होती. या प्रकरणात पोलीसांनी महेश पाडावे याच्या विरोधात भादविक ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
