दारुड्या दिराने भावजयीला केली मारहाण

0

खेड : स्वयंपाक घरात जेवण बनवणा-या आपल्या भावजयीला हातातील काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी तरूणावर सोमवारी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान भरणे समर्थ नगर या ठिकाणी घडली.

HTML tutorial

प्राची विनय तोडणकर या महिलेने याबाबत सोमवारी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या रविवारी दुपारी स्वयंपाक घरात जेवण बनवत असताना दारूचे व्यसन असलेला दीर विशाल विजय तोडणकर याने कसलेही कारण नसताना हातातील काठीने मारहान केली. यामध्ये प्राची या गंभीर जखमी झाल्या, असे त्यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे. तक्रारी नुसार विशाल तोडणकर यांच्याविरूद्ध खेड पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३२४ ,३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान मयेकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here