चिपी विमानतळ हवाई वाहतुकीसाठी त्वरित सुरू करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

0

मुंबई : डीजीसीएच्या निकषानुसार सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची 74 वी बैठक ‘वर्षा’ निवासस्थानी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. बैठकीत राज्यातील विविध विमानतळांच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवासुविधांबाबत आढावा घेण्यात आला.

चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिह्यात पर्यटन व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हा विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामाबाबत डीजीसीएने अहवाल दिला आहे. त्या निकषानुसार वेळेत धावपट्टीचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. निश्चित अशा कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे यासाठी विमानतळ विकास कंपनी, एमआयडीसी यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव बलदेव सिंह, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱहाड, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी संजय कांगणे, कंपनी सचिव प्रणीता भिसे उपस्थित होते. याशिवाय नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्ण, नागपूरचे जिल्हाधिकारी तथा विमानतळ विकास कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक रवींद्र ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 01-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here