“सकाळी पेपर वाचल्यावर अर्थमंत्र्यांना व्याजकपातीसंदर्भात समजलं असावं की…”

0

नवी दिल्ली : लहान बचत योजनांवरील व्याजकपातीच्या निर्णयावरुन मोदी सरकारने यू-टर्न घेतला आहे. अर्थमंत्रालयाने व्याजदर कमी करण्याचा निर्णय मागे घेण्याची घोषणा आज (१ एप्रिल) सकाळी केली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देणारा निर्णय घेतल्यानंतर केंद्रावर सर्वच स्तरातून टीका केली जात होती. त्यामुळेच आज सकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्याजकपातीचा निर्णय चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जैसे थे राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र निर्मला यांनी ट्विटरवरुन दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी आणि शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवरुन निर्मला यांनी चुकून निर्णय निघाल्याच्या स्पष्टीकरणावरुन टीका केली आहे.

निवडणुक प्रचारामध्ये व्यस्त असणाऱ्या प्रियंका यांनी निर्मला यांचे ट्विट रिट्विट करत त्यावर प्रतिक्रिया दिलीय. प्रियंका यांनी खरोखरच तुमच्याकडून चूक झाली की काय असा टोला लगावला आहे. ‘खरंच निर्मला सीतारामन तुमच्याकडून सरकारी योजनांवरील व्याजकपात करण्यासंदर्भातील निर्णय चुकून प्रसिद्ध झाला की निवडणुका लक्षात घेता तुम्ही हा निर्णय मागे घेत आहात?’, असा प्रश्न विचारला आहे.

दुसरीकडे शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही खोचक शब्दात निर्मला सीतारामन यांना टोला लगावला आहे. सकाळी पेपरमधील बातम्या वाचल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना व्याजकपातीसंदर्भात समजलं असावं, असं चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘व्याजकपात करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. असं वाटतंय की सकाळी महत्वाची वृत्तपत्रं वाचल्यानंतर अर्थमंत्र्यांना व्याजकपात झाल्यासंदर्भातील माहिती मिळाली. खरं हे आहे की, सध्याच्या सरकारची धोरणं ही चुकून घेतलेल्या निर्णयासारखी असल्यानेच अर्थव्यवस्थेची पडझड होत आहे,’ असं ट्विट चतुर्वेदी यांनी म्हटलंय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 01-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here