चक्क कोर्टात हजर झाले १३ पोपट

0

नवी दिल्ली : नागरिकांना न्याय देण्यासाठी कोर्ट बनवले आहेत, पण काल बुधवारी पटियाला कोर्टामध्ये 13 पोपटांना हजर करण्यात आले. या पोपटांना एक परदेशी नागरिक परदेशात घेऊन जाण्यासाठी निघाला होता. यावेळी त्या विदेशी नागरीकास सीआयएसएफ टीमने इंदिरा गांधी विमानतळावर अटक केली.

HTML tutorial

या नागरिकाची चौकशी केली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे पोपट सापडले. चौकशी केली असता हे पक्षी परदेशात घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. पक्षांची तस्करी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वन्यजीव अधिकाऱ्यांकडे हे पक्षी देण्यासाठी त्यांना पटियाला कोर्टामध्ये हजर करण्यात आले.

संशयितासा 30 ऑक्टोंबरपर्यंत कोठडी

पोपटांची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकास कोर्टाने 30 ऑक्टोंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर पोपटांना ओखला पक्षी पार्कमध्ये पाठविण्याचे आदेश  कोर्टाने दिले आहेत.

फेरीवाल्याकडून खरेदी केले होते पोपट
संशयिताच्या चौकशी दरम्यान हे पोपट एका फेरीवाल्याकडून खरेदी केले असल्याचे त्याने सांगितले. सीआयएसएफने सांगितले की संशयित हे पोपट उझबेकिस्तान  या देशात घेउन जात होता, या देशामध्ये पोपटांना जास्त मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here