कोरोनाचा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?; चाचपणी सुरू

0

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगानं वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. धुळवड आणि त्यानंतर एक दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटली. मात्र त्यानंतर लगेचच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन होईल की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांचे प्रचंड हाल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कित्येकांना पगार कपात सहन करावी लागली. त्यामुळे जनतेचा लॉकडाऊनला विरोध आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारनं इतर पर्यायांचा विचार करत आहे. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सोय उपलब्ध व्हावी याची चाचपणी राज्य सरकारनं सुरू केली आहे. लॉकडाऊन करण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना घरूनच काम कसं काम करता येईल या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य सरकार सर्व खाजगी कंपन्यांना तसे आदेश देण्याची शक्यता आहे. नागरिक घरी राहिल्यानं रस्त्यावरची गर्दी कमी होईल. ट्रेन, बस आणि मेट्रोमध्ये होणारी गर्दी टाळता येईल, असा सरकारचा विचार आहे. त्यासाठी वर्क फ्रॉम होमकडे सरकारनं विशेष लक्ष दिलं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना सरकार वर्क फ्रॉम होमसाठी आदेश देणार असल्याची चर्चा आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:56 AM 02-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here