पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार, आयसीसीनं उचललं मोठं पाऊल

0

भारत-पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. पण, दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थिती पाहता भारत-पाकिस्तान फक्त ICC आणि आशिया चषक स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध खेळतात. २००७म्ये पाकिस्तानचा संघ पाच वन डे व तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यानंतर २०१२-१३मध्ये भारत दौऱ्यावर पाकिस्तान मर्यादित षटकांची द्विदेशीय मालिका खेळला होता

भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा भारतीय भूमीत क्रिकेटचा थरार रंगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतात यंदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यासंदर्भात पाकिस्तानच्या सहभागावरून उडालेल्या गोंधळावर आयसीसीनं मोठं पाऊल उचललं आहे. ऑक्टोबर महिन्यात हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे आणि यासाठी पाकिस्तानच्या खेळाडू व सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही BCCIनं आयसीसीला दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:43 PM 02-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here