पुणे जिल्ह्यात सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी

0

पुणे : पुणे शहरांमध्ये लॉकडाउन टळला असला तरी अधिकचे निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमावली नुसार ६ ते ६ पर्यंत शहरात पुर्णपणे बंद रेस्टॉरंट आणि बार पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. तसेच पीएसपीएमएल, मॉल, आठवडी बाजार हे ७ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातलं मिनी लॉकडाऊन कसं असेल?

लॉकडाऊन कुणालाच नको आहे मात्र वाढणारी रुग्णसंख्या पाहता कडक निर्बंध तर लादावे लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात पुढील काही दिवसांसाठी काही नियम आखले आखले आहेत. नव्या नियमांनुसार सार्वजनिक बससेवा, धार्मिक स्थळं, हॉटेल, रेस्टॉरंट सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

दिवसभर जमावबंदी, संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी

संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. दिवसभर जमावबंदी असणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळं बंद…

सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील. मॉल आणि सिनेमा हॉल 7 दिवसांसाठी बंद राहतील. तसंच धार्मिक स्थळं देखील पुढील 7 दिवसांसाठी बंद असतील.

पुण्यातील PMPML बससेवा बंद

पुण्यातील PMPML बससेवा पुढील 7 दिवस बंद राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. तसंच आठवडे बाजारही बंद राहणार आहे.

लग्न, आणि अंत्यसंस्कारांना परवानगी, बाकी कार्यक्रमांना नाही…

लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत, हा देखईल मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिम सुरु राहणार

पुण्यातील जीम सुरु राहणार आहे. जीम बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत, शाळा महाविद्यालय 30 एप्रिल पर्यंत बंद

दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. तसंच शहरातील शाळा महाविद्यालय 30 एप्रिल बंद राहणार

पुण्याची परिस्थिती गंभीर

पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, “पुण्यातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील”.

“बेडची संख्या वाढवणार आहे,टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय आहे. सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक आहे.”

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:59 PM 02-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here