रत्नागिरीतील एलईडी लाईट नौकेवर मालवणात कारवाई

0

मालवण आचरे समोरील 20 वाव खोल समुद्रात बंदी असलेल्या एलईडी लाईट व जनरेटर साहित्य असलेल्या साखरीनाटे रत्नागिरी येथील नौकेवर मत्स्य विभागाने शुक्रवारी संध्याकाळी कारवाई करत नौका ताब्यात घेतली. सिंधुदुर्ग मत्स्य विभागाच्या शीतल या गस्ती नौकेने सहायक आयुक्त रवींद्र मालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी मुरारी भालेकर, सुरक्षा रक्षक दीपेश मायबा, स्वप्नील सावजी, पोलीस कर्मचारी अनविता कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली. आचरे समोरील 20 वाव खोल समुद्रात H.ATAULLA-IND MH.4 MM 2726 ही नौका आढळली. या नौकेवर बंदी असलेले एलईडी लाईट साहित्य व जनरेटर आढळून आला. तसेच एक तांडेल व दोन खलाशीही होते. पुढील कारवाई सुरू आहे अशी माहिती परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:19 PM 03-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here